Premium|History of Clocks : सूर्याच्या सावलीपासून स्मार्टवॉचपर्यंत; माणसाने वेळ मोजायला कधी आणि का सुरुवात केली?

Evolution of Timekeeping : सूर्याच्या सावलीपासून मनगटावरील स्मार्टवॉचपर्यंत घड्याळाचा प्रवास माणसाने वेळ मोजण्याची गरज कशी निर्माण झाली, याची रंजक कहाणी सांगतो आणि बदलत्या तंत्रज्ञानाची साक्ष देतो.
History of Clocks

History of Clocks

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

कधीकाळी सूर्याच्या सावलीवर अवलंबून असलेलं घड्याळ आता माणसाच्या मनगटावरील एका छोट्याशा स्क्रीनवरून त्याचा जगाशी संबंध जोडत आहे. पण तरीही या सगळ्या आधुनिकतेतही घड्याळाचं मूळ काम सारखंच आहे; वेळेची जाणीव करून देणं. फरक फक्त एवढाच आहे, की पूर्वी ते फक्त वेळ सांगत होतं आणि आज मात्र ते आपल्यासोबत ती वेळ जगत आहे.

अशी कोणती गोष्ट आहे, की तिच्याशिवाय जगातलं कोणतही काम पूर्ण होऊ शकत नाही? तिचा प्रवास शून्यापासून ते अनंतापर्यंत सतत सुरूच असतो. माणसाच्या जन्म आणि मृत्यूपर्यंतच्या प्रवासात सगळ्याच गोष्टीं़़़़त तिचा सहभाग असतो, व्यक्तीपरत्वे तिचं मोलही वेगळं असतं. ती देताही येते आणि घेताही येते, पण तरीही तिला हातात मात्र पकडता येत नाही आणि एकदा गेली की ती परतही येत नाही!

अगदी बरोबर ओळखलंत! ‘वेळ’ ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या आयुष्याची खरी साथीदार आणि किंबहुना साक्षीदारसुद्धा असते. काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तर वेळ निघून गेल्यावर काही गोष्टींसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरतात. अशा या अदृश्य सखीला मोजण्याची गरज माणसाला कधी व का बरं वाटली असावी? कदाचित ज्या दिवशी आदिमानवाला रोज सूर्य उगवतो, मावळतो, दिवस संपला की रात्र होते, कधी दिवस लहान व रात्र मोठी; तर कधी रात्र लहान व दिवस मोठा असतो, ऋतू बदलत राहतात याची जाणीव झाली असेल, आणि निसर्गाच्या या सातत्याने चालणाऱ्या चक्रासोबत आपल्या जगण्याला एक लय देण्याची आणि शिस्त लावण्याची आवश्यकता त्याला वाटली असेल, तेव्हा त्याने या वाहत्या काळाला/वेळेला मोजण्याचा, समजून घेण्याचा आणि आपल्या जीवनाला विशिष्ट चौकटीत बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असावा.

History of Clocks
Premium|Artificial Narrow Intelligence (ANI) : सकाळपासून रात्रीपर्यंत: एआयच्या सहवासातील आपला प्रवास
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com