Home Decor : तुमच्या घराची सजावट करताना या गोष्टी ठेवा लक्षात

home decor
home decoresakal

तुमच्या वास्तूचे सौंदर्य वाढवण्यासाठी ॲक्सेसरी महत्त्वाच्या असतात, हे लक्षात घ्यायला हवे. या ॲक्सेसरींमुळे वास्तूला एक जिवंतपणा येतो. एखाद्या कलाकाराच्या कलात्मकतेतून साकारलेल्या वस्तू जागेची शोभा वाढवतात यात शंकाच नाही.

आशिष देशपांडे

होम डेकॉरच्या बाबतीत सध्या सगळ्यांनाच मिनिमलिस्टिक डिझाईन जास्त आवडतात. कोणत्याही वास्तूचे इंटेरियर डिझाईन करताना ते साधे आणि सोपे असावे, अशी सध्याच्या ग्राहकांची इच्छा असते. त्यात प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स करणेही फार कष्टाचे काम असू नये, अशीही मागणी असते. त्यामुळे सध्याचा ग्राहक होम डेकॉरसाठी लागणारी कोणतीही वस्तू घेताना विचारपूर्वक घेतो.

काही घरांमध्ये नेहमीचे फर्निचर वगळता इतर काहीच ॲक्सेसरी दिसत नाहीत, म्हणजेच वेगळे होम डेकॉर केलेले दिसत नाही. कारण कमीत कमी फर्निचर आणि गरजेपुरत्याच वस्तू वापरण्याची काही लोकांना आवड असते.

पण याच ॲक्सेसरी तुमच्या वास्तूचे सौंदर्य वाढवण्यासाठी महत्त्वाच्या असतात, हे लक्षात घ्यायला हवे. या ॲक्सेसरींमुळे वास्तूला एक जिवंतपणा येतो. एखाद्या कलाकाराच्या कलात्मकतेतून साकारलेल्या वस्तू जागेची शोभा वाढवतात यात शंकाच नाही. पण अशा वस्तू वापरायला सोप्या असाव्यात.

home decor
Home Care Tips: घराच्या भिंतीना वाळवी लागलीय? मग या उपायांनी वाळवी होईल नष्ट

आज बाजारात घर सजावटीच्या भरपूर ॲक्सेसरी मिळतात. ऑनलाइन शॉपिंगमुळे या वस्तू घरी बसूनदेखील आपण ऑर्डर करू शकतो, पण या वस्तू घेताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात-

कोणत्याही ॲक्सेसरीच्या ‘क्वांटिटी’पेक्षा ‘क्वालिटी’ महत्त्वाची असते. कारण नुसत्याच जागा भरायच्या म्हणून आपण वस्तू आणल्या, तर बहुतांश वस्तू नुसत्याच पडून राहतात. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या आणि आवश्यक तेवढ्याच वस्तू घ्यायला हव्यात.

वस्तू घेताना त्या वस्तूचा आकारदेखील तेवढाच महत्त्वाचा असतो. एखाद्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर जर अगदी छोटेसे दोन पक्षी काढले आणि उरलेला कॅनव्हास रिकामाच ठेवला, तर ते चांगले दिसत नाही. हेच होम डेकॉर करताना लागू होते. जागा किती मोठी आहे, याचा विचार न करता एखादी ॲक्सेसरी घेतली तर ती शोभून दिसणार नाही. त्यामुळे वस्तू घेताना नेहमीच त्या जागेच्या आकारमानानुसार घ्यावी.

काही ॲक्सेसरी एकत्रित घ्याव्या लागतात. म्हणजे काही वस्तू वेगवेगळ्या आकारात, प्रकारात असल्या तरी त्या सर्व एकत्र ठेवल्या तरच छान दिसतात, त्यांचा सेट तयार होतो. त्यातील एखादीच वस्तू ठेवली तर ते चांगले दिसत नाही. उदाहरणार्थ, समजा आपण एखादे स्कल्प्चर घेतले, तर ती एक मोठी वस्तू व त्याचबरोबर संबंधित अजून एक ते दोन वस्तू घ्याव्या लागतील, जेणेकरून जागेला उठाव येईल.

कलात्मक वस्तूंचा विचार करत असताना आपल्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम अँटिक वस्तू येतात. अँटिक वस्तूंचा वापर करून एक थिमॅटिक इंटेरियर नक्कीच करू शकता.

रंगसंगती हा कोणत्याही कलेचा महत्त्वाचा भाग असतो. वस्तू घेताना घरातील रंगसंगतीही विचारात घ्यावी. शक्यतो कॉन्ट्रास्ट रंगसंगती असावी. काही मॉडर्न डिझाईनमध्ये आजकाल ‘सटल’ हा रंगसंगतीशी संबंधित शब्द सारखाच ऐकायला मिळतो. पण या रंगाच्याच ॲक्सेसरी आपण वापरल्या, तर कदाचित जो उठाव अपेक्षित आहे तो मिळणार नाही. त्यामुळे रंगसंगतीनुसार ॲक्सेसरी निवडणे महत्त्वाचे आहे.

इंटेरियर झाल्यानंतर होम डेकॉरसाठी काही वस्तू आणायच्या म्हटले की अनेकजण बाजारातून पेंटिंग, पॉट, कार्पेट अशा नेहमीच्याच वस्तू आणतात. पण याव्यतिरिक्त आउट ऑफ द बॉक्स विचार करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अनेक सुंदरशा वस्तू आणता येतील, आणि अशा आऊट ऑफ द बॉक्स वस्तूंमुळेच तुमच्या घरातही ‘मास्टरपीस’ तयार होऊ शकेल.

केवळ ॲक्सेसरी वापरूनच घराचे सुशोभीकरण होते असे नाही, कधीकधी आपण कलात्मक फर्निचरचा वापर करू शकतो किंवा आर्टिस्टिक लाईटचा वापर करू शकतो, तेदेखील आर्टपीसच आहे.

कलात्मक वस्तूंचा वापर करून तुम्ही तुमच्या घरात जादुई दुनिया तयार करू शकता, कदाचित यासाठी तुम्हांला डेकोरेटरची गरज भासू शकते.

home decor
Diwali Decoration : आली माझ्या बाल्कनीत ही दिवाळी; ‘या’ टिप्सने सजवा तुमची बाल्कनी

ठरावीक जागेत कलाकृतींचा वापर करताना, ती कलाकृती किती महागडी आहे यापेक्षा, ती त्या जागेशी आणि त्या व्यक्तीच्या किती जवळची आहे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. कलात्मक वस्तूंचा वापर योग्य पद्धतीने केल्यास वास्तूला वेगळेपण प्राप्त होते व त्या जागेची स्वतःची ओळख निर्माण होते. साध्या पुस्तकांच्या मांडणीतदेखील एक आर्टपीस तयार होतो व ती पुस्तकेच त्या जागेची ओळख ठरतात. कोणतीही जागा प्रसन्न असण्यामागे व आठवणीत राहण्यामागे या कलात्मक वस्तूंचा मोठा वाटा असतो. आपल्या घरात वापरलेल्या वस्तू स्वतःची एक ओळख निर्माण करतात, कदाचित त्या जागेच्या आठवणी ताज्या करताना प्रत्येक कोनाडा स्वतःची गोष्ट सांगत असतो, असे म्हणावे लागेल. त्यासाठी त्या जागेतील पडदे, उशा, तिथे वापरलेल्या हस्तकलेच्या वस्तू या सगळ्यांचा मोठा सहभाग असतो. या वस्तू होम डेकॉरचाच तर भाग असतात.

home decor
Green Tea Benefits : ‘या’ वेळेस ग्रीन टी प्यायल्यास मिळतील हे 6 जबरदस्त फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com