Green Tea Benefits : ‘या’ वेळेस ग्रीन टी प्यायल्यास मिळतील हे 6 जबरदस्त फायदे

Health benefits : ग्रीन टी पिण्याचा योग्य वेळ खूपच कमी लोकांना माहिती आहे. हा चहा पिण्याचा योग्य वेळ आणि फायदे याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Green Tea Benefits News
Green Tea Benefits NewsSakal

Green Tea Pinyache Fayde : धकाधकीच्या युगात हल्ली बहुतांश जण फिटनेसची पुरेपूर काळजी घेत आहेत. यासाठी ही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीचे डाएटही फॉलो करताना दिसतात. ज्यामध्ये कीटो, लिक्विड, इंटरमिटेंट इत्यादी डाएट प्रकारांचा समावेश आहे. 

Green Tea Benefits News
ग्रीन टी की, ब्लॅक टी; आरोग्यासाठी जास्त चांगले काय?

पण या सर्व डाएटमधील एक गोष्ट अगदी सामान्य असते ते म्हणजे ग्रीन टी. या चहाचा फिटनेसप्रेमी आपल्या डाएटमध्ये आवर्जून समावेश करतात. पण हा चहा कधी प्यावा, याची योग्य वेळ मात्र यांना माहिती नसते. या लेखाच्या माध्यमातून आपण ग्रीन टी कधी प्यावा व त्याचे फायदे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.  

Green Tea Benefits News
Health Tips: रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

ग्रीन टी कधी प्यावा व त्याचे फायदे 

  • ग्रीन टी सकाळी व दुपारच्या वेळेस पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. जेवण केल्यानंतर दोन तासांनंतर आपण ग्रीन टी पिऊ शकता.  

  • हा चहा प्यायल्याने शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते. यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी देखील घटते. सोबत शरीराची चयापचयाची क्षमता देखील मजबूत होते.  

Green Tea Benefits News
Best Time For Green Tea : वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी कधी प्यावा? काय सांगतात तज्ज्ञ
  • हा चहा यकृताच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी घटते. 

  • ग्रीन टीमध्ये सोडियम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर, प्रोटीन, लोह, थियामिन, रायबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी - 6 यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश असतो. 

  • हा चहा योग्य प्रमाणात प्यायल्यास मेंदूचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने सुरू राहते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो. तणाव व चिंता यासारख्या समस्येपासूनही मुक्तता मिळते. 

  • ग्रीन टीमुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. यामुळे चेहऱ्याची त्वचा सैल पडत नाहीत. तसंच सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही त्वचेचं संरक्षण होते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com