संपादकीय
आजकाल साहित्याच्या दुनियेत शिरायचं असेल, तर पेन नसून रिंगलाइट असणं गरजेचं झालंय. लेखक पुस्तक लिहीत असताना त्यांचा अनुभव, विचार शब्दांच्या रूपात पुस्तकाच्या पानापानांत उमटायचे. मग वाचक त्या लेखकाचे साहित्य शोधून शोधून वाचायचे.
आधुनिक काळातील लेखक इन्स्टाग्रामवर ‘कंटेंट क्रिएटर’ म्हणून फॉलोअर्सच्या फीडमध्ये ढकलून पुढे येतो. उदाहरणार्थ, एखादी तरुण लेखिका (सध्या जी ‘इन्स्टापोएट’ म्हणून ओळखली जाते) तिच्या १५ सेकंदांच्या व्हिडिओत हातात कॉफीचा मग घेऊन दिवा विझतानाच्या आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर एक हळवी कविता सादर करते.