रवि आमले
इलुमिनाती ही एक गुप्त संघटना होती. आज ती अस्तित्वात नाही. पण त्याने काय फरक पडतो? अनेक थोरथोर, बुद्धिमान वगैरे माणसांना आजही ही इलुमिनाती कुठे कुठे दिसत असते. कोणास ती गायक-गायिकांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम दाखवलेल्या प्रतिकांत दिसते. कोणास ती जगाच्या अर्थकारणात दिसते, कोणास जागतिक उलथापालथीत दिसते.
दाक्षिणात्य चित्रपटांतील महानायक मोहनलाल यांचा लुसिफर हा एक गाजलेला राजकीय थरारपट. त्यात मोहनलाल यांचे नाव होते खुरेशी अबराम. त्या चित्रपटाच्या अखेरच्या नामावलीत वृत्तपत्रांची काही कात्रणे दिसतात. त्यातील एका लेखाचा मथळा होता - ‘खुरेशी अबराम : इलुमिनातीचा नवा हात?’