रिपोर्ताज। सुरेंद्र पाटसकर
प्रसंग १
पहलगाम : वेळ सकाळी अकराची असूनही बाजारात शुकशुकाट, दुकाने उघडी पण ग्राहकांची प्रतीक्षा... दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेली भीती महिनाभरानंतरही कायम...
प्रसंग २
सोनमर्ग : वेळ सायंकाळी चार वाजताची... जम्मू-काश्मीर हॉटेल मालक संघटनेचे राज्यभरातील सदस्य, महाराष्ट्र व गुजरातमधून आलेले टूर ऑपरेटर यांची बैठक... यावेळी अनंतनाग राजौरीचे खासदार मिया अल्ताफ व श्रीनगरमधील इदगाह मतदारसंघाचे आमदार मुबारक गुल यांची उपस्थिती... परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकारने मदत करावी, हॉटेलचे दर आटोक्यात ठेवावेत, पर्यटकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, त्यांच्यासाठी काही विशेष योजना तयार करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.