सोनिया उपासनीफॅशन कॉर्नर । आपल्या छोट्या-मोठ्या बॅगेची नीटपणे निगा राखून तुम्ही तुमच्या बॅगचे नावीन्य आणि आयुष्य दोन्ही टिकवून ठेवू शकता..बॅग ही एक अशी वस्तू आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामात उपयोगी पडते. शाळा-कॉलेजांत जाणारे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींपासून ते पार्टीला जाताना, कुठल्याही कामावर जाताना सोबत असते ती बॅग. अगदी प्रवास करणाऱ्या पर्यटकांपर्यंत प्रत्येकासाठी बॅग गरजेची आहे. वस्तू ठेवण्यासाठी, व्यवस्थितपणे कॅरी करण्यासाठी आणि आपले वैयक्तिक सामान सुरक्षित ठेवण्यासाठी बॅग महत्त्वाची ठरते..मॉन्सूनच्या काळात हवेत ओलावा आणि दमटपणा असतो. त्याचा परिणाम आपल्या कपड्यांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत सगळ्यावर, विशेषतः बॅग्जवरही होतो. आपण रोजच्या वापरासाठी, प्रवासासाठी किंवा ऑफिससाठी ज्या बॅग्ज वापरतो, त्यांचे नीट काळजीपूर्वक जतन करणे गरजेचे असते. दमट हवामानामुळे बॅगांवर बुरशी येणे, डाग येणे, बॅगेला कुबट वास येणे आणि रंग फिका होणे इत्यादींची शक्यता असते. वेगवेगळ्या बॅग्जची काळजी ह्या वातावरणात कशी घ्यायची ते आपण बघू या..लेदर बॅग्जलेदर बॅग्ज आकर्षक आणि टिकाऊ असतात, पण दमट हवामानात त्यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी -बॅग कोरड्या जागी ठेवावी. लेदर बॅग्ज कधीही बंद कपाटात प्लॅस्टिकमध्ये ठेवू नये. त्याऐवजी बॅग कॉटन डस्ट बॅगमध्ये ठेवून हवेचा संपर्क राखावा.सिलिका जेल पाऊच वापरावा. ओलावा शोषण्यासाठी बॅगमध्ये किंवा बॅग ठेवलेल्या शेल्फमध्ये सिलिका जेलचे पॅकेट ठेवावे.लेदर कंडिशनर वापरावा. महिन्यातून एकदा लेदर कंडिशनर लावल्याने बॅगेची चमक आणि लवचिकता टिकून राहते.ओलसर बॅग लगेच वाळवावी. जर पावसात बॅग भिजली असेल, तर लगेच टॉवेलने कोरडी करावी आणि नैसर्गिक वाऱ्यावर (सूर्यप्रकाश न देता) वाळवावी.थेट सूर्यप्रकाशात बॅग सुकवू नये. त्यामुळे लेदर क्रॅक होऊ शकते..लेदर बॅग्ज धुणे टाळावे.कॅनव्हास बॅग्जकॅनव्हास बॅग्ज हलक्या, आरामदायक आणि वापरायला सोप्या असतात. दमट हवामानात मात्र त्यांना बुरशी आणि डागांचा धोका असतो.बॅग साबणाच्या पाण्याने स्वच्छ करावी, हलका साबण आणि कोमट पाणी वापरून ब्रशने स्वच्छता करावी.सुकवताना उलटी करून ठेवावी व आतून नीट वाळल्याची खात्री करावी.बॅग कोरड्या कपड्याच्या पिशवीत ठेवावी, प्लॅस्टिक बॅग टाळावी.बॅग ओलसर स्थितीत फोल्ड करून ठेवू नये.अत्यंत गरज असल्याशिवाय वॉशिंग मशिनमध्ये बॅग धुणे टाळावे..सिंथेटिक/नायलॉन बॅग्जया बॅग्जवर पाण्याचा तसा परिणाम होत नाही, पण त्यांच्यावर ओलसर हवामानाचा परिणाम म्हणून वास येऊ शकतो. त्यामुळे -बॅग नेहमी मोकळ्या जागी ठेवावी आणि घरात आल्यानंतर बॅग उघडून ठेवावी.दिवसातून एकदा बाह्य पृष्ठभाग ओलसर कपड्याने पुसावा आणि मग कोरड्या कपड्याने पुसून घ्यावे.बॅगेमध्ये परफ्युम पाऊच ठेवावा, त्यामुळे दमटपणामुळे येणारे विविध वास कमी होण्यास मदत होईल.फॅब्रिक बॅग्ज (कापडी पिशव्या)कापडाच्या बॅग्ज स्वच्छ ठेवणे दमट हवामानात कठीण जाऊ शकते. त्यामुळे -अशा प्रकारच्या बॅग्ज वॉशिंग मशिनमध्ये धुवाव्यात. दर एक-दोन आठवड्यांनी बॅग धुवावी.सुकवताना उलटी करून टांगून ठेवावी.अँटिफंगल स्प्रे वापरावा. बाजारात मिळणारे अँटिफंगल स्प्रे कधीतरी फवारून ठेवावेत..ट्रॅव्हल/ ट्रॉली बॅग्जया मोठ्या बॅग्ज सहसा वापरात नसतात, त्यामुळे ओलाव्यापासून त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.बॅगेच्या आत सुतळीचा गोळा किंवा कागद ठेवावा. हे दोन्ही ओलावा शोषून घेण्याचे काम करतात.दर १५ दिवसांनी बॅग उघडून हवा द्यावी.बाहेरून स्वच्छ ठेवण्यासाठी वेट वाइप्स वापरावेत.बॅग स्टोअर करताना वर काहीही ठेवू नका, बॅगेचा आकार खराब होतो.सिलिका जेल, चारकोल सॅशे किंवा बेकिंग सोडा पाऊच वापरावा. हे सर्व पदार्थ ओलावा आणि वास दोन्हींपासून संरक्षण करतात.बॅग वापरून झाल्यावर लगेच रिकामी करावी..Premium| Puppy Love : डेक्स्टर आणि चिलटं....महत्त्वाच्या टिप्सबॅगेमध्ये सगळ्या वस्तू एकत्र न ठेवता वेगवेगळ्या ठेवाव्यात, विशेषतः खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या इत्यादी.बॅग बदलत राहावी. एकच बॅग दररोज वापरण्यापेक्षा दोन-तीन बॅग्ज आलटून पालटून वापराव्यात.बॅग्ज स्टोअर करताना त्यांचा आकार आणि मजबुती टिकून राहावी अशा पद्धतीने स्टोअर करणे गरजेचे आहे.पावसात कुठल्याही बॅगेच्या झिप्स अडकू नयेत यासाठी त्यांना वेळोवेळी ऑइलिंग करावे.दमटपणा शोषून घ्यायला विकतचे पाऊच आणायला वेळ नसेल, तर घरच्या घरी कापडाच्या पुरचुंडीत लवंगा, तांदूळ, कापूर वापरून पुरचुंडी तयार करू शकता.अशा प्रकारे आपल्या छोट्या-मोठ्या बॅगेची नीटपणे निगा राखून तुम्ही तुमच्या बॅगचे नावीन्य आणि आयुष्य दोन्ही टिकवून ठेवू शकता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.