स्वप्ना साने
आठवड्यातून एकदा फेस पॅक लावायला हरकत नाही, कारण योग्य पॅक लावल्यावर त्वचेला पोषण मिळेल आणि त्वचा सुदृढ दिसेल. टीनएजर्स असोत वा तरुण, मध्यमवयीन असोत वा प्रौढ, स्त्री-पुरुष सर्वांसाठीच फेस पॅकचा उपयोग गुणकारी आहे; योग्य प्रॉडक्टचा वापर केला तर!
त्वचा कोरडी वाटतेय का? फेस पॅक लाव! चेहऱ्यावरचे चट्टे फेसपॅकमुळे जातील बघ. इन्स्टंट ग्लो हवा आहे ना, मग फेस पॅक का नाही लावत? असे अनाहूत सल्ले तुम्हालाही मिळतात का? सल्ला चांगला आहे, पण त्यामागोमाग येणारे प्रश्नही अनेक आहेत. म्हणजे मुळात ‘फेस पॅक’ लावायचा म्हणजे नेमके काय लावायचे? प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एकच फेस पॅक लावायचा? कोणता पॅक लावायचा? घरी करायचा की विकत आणायचा?...एक ना अनेक...या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते आहे.