अर्थविशेष । भूषण महाजन
कोविडचे पुनरागमन झाल्याचे समोर आले आहे. ३,४०० बाधित रुग्ण व त्यातून काही मृत्यू. हा आकडा दचकवणारा असला, तरी वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असे, की कोविडचा हा अवतार सौम्य आहे आणि मोठ्या चिंतेचा विषय नाही. हे कोविडचे सावट गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत दिसतेय.
पूर्वीच्या काळी भर समुद्रात वाऱ्याची दिशा कळण्यासाठी दर्यावर्दी खलाशी जहाजावर एक दिशा दर्शवणारे कोंबडे प्रतिकृती स्वरूपात लावत असत. सिंदबादच्या सफरींमध्ये अधूनमधून वादळात जहाज भरकटायचे ते दिशा चुकल्यामुळेच! आजच्या तेजी-मंदीच्या वादळात आपले गुंतवणुकीचे जहाज असे गोंधळून जायला नको म्हणूनच संयम हवा.