शितल मुरांजन
चॉकलेट पाणीपुरी
साहित्य
पुऱ्यांसाठी
दोन कप रवा, पाव कप तेल, मीठ, १ टीस्पून साखर, अर्धा कप पाणी.
स्टफिंगसाठी
दोनशे ग्रॅम डार्क चॉकलेट, ४ टेबलस्पून फ्रेश क्रीम, बदाम-पिस्त्याचे काप, ४ टेबलस्पून स्ट्रॉबेरी क्रश, चेरी, मैदा, पायपिंग बॅग.
कृती
पाणीपुरीच्या पुऱ्या करण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये रवा, मीठ, साखर आणि कडकडीत तेलाचे मोहन घालून चांगले मिसळावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यावा आणि ३० मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंतर मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन पोळी लाटावी आणि लहान वाटीच्या मदतीने गोल आकाराच्या पुऱ्या कापाव्यात.
गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात. त्यानंतर, डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट वितळवावे. या वितळलेल्या चॉकलेटमध्ये तयार पुऱ्या हलक्या हाताने बुडवून घ्याव्यात. उरलेल्या चॉकलेटमध्ये फ्रेश क्रीम घालून पुन्हा डबल बॉयलर पद्धतीने मिसळावे आणि बाजूला ठेवावे. सर्व्ह करताना हे तयार मिश्रण (गनाश) पायपिंग बॅगमध्ये भरून पुऱ्यांमध्ये भरावे. शेवटी स्ट्रॉबेरी क्रश, ड्रायफ्रूट्स आणि चेरीने सजावट करून या अनोख्या चॉकलेट पाणीपुरीचा आस्वाद घ्यावा.