
आरती अविनाश पालवणकर
साहित्य
चार वाट्या तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, १ टीस्पून मेथ्या.
कृती
डोशाचे पीठ तयार करण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ आणि मेथ्या सहा तास पाण्यात भिजत ठेवाव्यात. भिजल्यावर हे सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. नंतर हे पीठ हाताने चांगले फेटून झाकून ठेवावे आणि आंबू द्यावे. डोशाचे पीठ तयार! याचे साधे डोसे करता येतात.