बी ग्रेसफुल । स्वप्ना साने
हेअर ट्रीटमेंट्सच्या दुष्टचक्रात अडकल्याने हेअर ट्रान्सप्लांटची वेळ येऊ शकते. हे टाळण्यासाठी प्रामुख्याने घेण्याची काळजी म्हणजे, पौष्टिक आहार घेणे, हेल्दी लाइफ स्टाइल फॉलो करणे आणि जास्तीत जास्त ऑरगॅनिक, नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे. मुलांनासुद्धा ह्याबद्दल जागरूक करावे.
कमी वयात हेअर ट्रान्सप्लांट केल्याचे हल्ली बऱ्याचदा ऐकायला मिळते. याची सुरुवात होते केस गळतीपासून. एक दिवस अचानक जाणवते, की डोक्याच्या मध्यभागी टक्कल पडले आहे अथवा समोरचे केस कमी झालेले आहेत.
मग धडपड सुरू होते; केस विरळ झालेला भाग दिसू नये ह्यासाठी केसांचे वळण बदलायचे, त्याप्रमाणे हेअर कट करायचा, आणि त्यानेही समाधान नाही झाले तर स्टायलिश कॅप वापरायची. अगदी नाइलाज होतो त्यावेळेस हेअर ट्रान्सप्लांट अथवा बॉल्ड पॅच वापरायचा पर्याय निवडला जातो.