
संपादकीय
आमचे येथे श्रीकृपेकरून चि. अमुक आणि चि.सौ.कां. तमुक यांचा शुभविवाह सुमुहूर्तावर करण्याचे योजले आहे. तरी वधू-वरांस शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण इष्टमित्रपरिवारासह अगत्य येण्याचे करावे, वगैरे मजकुराची आमंत्रणपत्रिका व्हॉट्सअॅपवर मिळणं ह्यात आता फार काही नावीन्य राहिलेले नाही.
हल्लीच्या पळापळीच्या दिवसांत विवाहाचं आमंत्रण असं व्हॉट्सअॅपवर आलं तर कोणी फारसं मनाला लावूनही घेत नाही. पूर्वी नाही का लग्नपत्रिका पोस्टानी यायच्या... आणि व्हॉट्सअॅपवरची आमंत्रणं आता आणखी लाइव्हही असतात. होल्ड. व्हॉट्सअॅपवरचं असं एखादं आमंत्रण तुमच्या मोबाईल हँडसेटसाठी काळ ठरू शकतं.