Premium|Bollywood Cars: चित्रपटांमधील क्लासिक कार्स; जेम्स बॉन्डपासून 'दिल चाहता है' पर्यंतचा प्रवास
राधिका परांजपे-खाडिलकर
सिनेसृष्टीचं आणि कार्सचं अनोखं नातं आहे. खरंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत सिनेसृष्टी कायमच कालानुरूप सुसंगत राहिली आहे. नव्या तंत्रज्ञानाला चित्रपटांतून महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. मग याला कार्स तरी कशा अपवाद असतील? आज आपल्याला व्हिंटेज वाटणाऱ्या कार्स जेव्हा लेटेस्ट मॉडेल होत्या तेव्हापासून चित्रपटांमध्ये झळकताहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधल्या काही कार्स त्या चित्रपटातल्या प्रमुख व्यक्तिरेखा भासाव्यात इतक्या दिलखेचक होत्या. अशा काही निवडक कार्सविषयी...
लहानपणापासून मला खरंतर कार्सचं एवढं आकर्षण नव्हतंच कधी, पण माझा दादा एकदम कारवेडा. रोजच्या पेपरमध्ये येणारे लेटेस्ट कारचे फोटो कापून डायरीत लावून ठेवायचा. एक दिवस त्याच्या डायरीत एक व्हिंटेज कार बघितली. तेव्हापासून हटके दिसणाऱ्या कार्स आवडायला लागल्या. हळूहळू नुसत्या बघून त्यांचं मॉडेल ओळखता येऊ लागलं. मग जाईन तिथं नकळत युनिक कार्सकडे लक्ष ठेवायची सवय लागली. मग कार्सचे गेम्स खेळणं, दादासारखीच सेम कारची स्टेशनरी घेणं या सगळ्याची सवय लागली. कुठे ट्रिपला गेल्यावर एखादी वेगळी कार दिसल्यावर उरलेल्या ट्रिपभर त्या कारविषयी चर्चा करणं हे एक प्रकारचं बाँडिंग रुटीन झालं होतं. वेगवेगळ्या चित्रपटांत बघितलेल्या व्हिंटेज कार्स प्रदर्शानांमध्ये जाऊन प्रत्यक्षात बघणं हा एक छंद झाला. त्यातूनच चित्रपट कसाही असो, कार्समुळे तो लक्षात राहू लागला. असेच कार्समुळे लक्षात राहिलेले काही चित्रपट...