Premium|Impact of Quick Commerce : आता कशाला उद्याची बात?

Consumer Behaviour and Quick Commerce : क्विक कॉमर्सने ग्राहकांचा वेळ वाचवला असला, तरी त्याने खरेदीच्या सवयी, गरजांची व्याख्या आणि त्वरित समाधानाची मानसिकता बदलली आहे. सुविधा आणि परिणाम यांचा समतोल महत्त्वाचा ठरत आहे.
Consumer Behaviour and Quick Commerce

Consumer Behaviour and Quick Commerce

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

प्रत्येक गोष्टीची एक अदृश्य किंमत असते. क्विक कॉमर्सनं आपल्याला अनेक सेवा देत आपला वेळ तर वाचवला आहे, पण त्या बदल्यात कळत नकळतपणे आपल्या काही सवयीही बदलल्या आहेत, काही छोट्या छोट्या गोष्टींमधला छुपा आनंदही हिरावून घेतला आहे. पूर्वी आपण गरजेनुसार बाजारात जायचो. आता बाजारच आपल्या गरजा ठरवू लागला आहे. या क्विक कॉमर्स ॲप्सची नोटिफिकेशन्स अनेकदा आपल्या खिशापेक्षा मनावर जास्त परिणाम करतात.

आता कशाला उद्याची बात?... भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचणाऱ्या श्रेष्ठ कलाकार व्ही. शांताराम यांच्या माणूस या चित्रपटातल्या अजरामर झालेल्या गाण्याच्या या ओळी. गीतकार अनंत काणेकर यांनी हे गीत प्रेमातल्या अधीरतेची भावना दर्शवण्यासाठी लिहिलं होतं. पण आज मात्र हे गाणं आधुनिक माणसाच्या जीवनशैलीचं ब्रीदवाक्यच झालं आहे जणू! सध्या सगळीकडे इन्स्टंटचा जमाना आहे. सगळं कसं आज, आत्ता, ताबडतोब हवं असतं. साधा रोज लागणारा किराणा असू दे, किंवा आगंतुक आलेल्या पै-पाहुण्यांची उठबस करायची असू दे, पटकन कुठेतरी जायचं असेल तर, एवढंच नाही, तर वस्तूंची किंवा अगदी शरीराचीही डागडुजी करायची असेल, तर आपला अमूल्य वेळ केवळ वाट बघण्यात न घालवता फास्टर फेणेपेक्षाही अधिक वेगानं आपल्या गरजांची पूर्तता होत असते. खरंच,

आयुष्य झालंय सोपं फार

एका क्लिकवर मिळतंय अपार...

ॲप नावाचा जिनी हातात

इच्छा पुरवतो काही क्षणात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com