
उन्मेष वाघ
कोणत्याही क्षेत्रात धोरणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. एक उदाहरण देतो...आम्ही ज्या पिढीने फक्त दूरदर्शन पाहिले आहे, त्यांना ॲलिस इन वंडरलँड ही मालिका आठवत असेल. त्यात, अॅलिस विचारते, ‘‘हा योग्य मार्ग आहे का?’’ उत्तर मिळते, ‘‘तुला कुठे जायचे आहे?’’ अॅलिस म्हणते, ‘‘मला माहिती नाही.’’ त्यावर उत्तर येते, ‘‘मग तू कोणताही मार्ग निवडलास तरी फरक पडत नाही.’’ धोरणाचा खरा उद्देश हाच असतो - तो दिशा ठरवत असतो.