

India Trade Strategy
esakal
मधुबन पिंगळे
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताने व्यापाराच्या प्राधान्यक्रमावर आणि संभाव्य पर्यायांवर गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच, आयात-निर्यातीच्या यादीचा विचार केला, तर या यादीमध्ये अनेक देशांबरोबरील व्यापार वाढल्याचे दिसून येते. कोणत्याही देशाला अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय हितसंबंध सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. त्या दृष्टीनेच भारताने धोरणामध्ये बदल केल्याचे दिसून येते.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा जगाला फटका बसला असून, त्यातून सावरण्यासाठी जगाला आणखी मोठा कालावधी लागणार आहे. इराणने रोखून धरलेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि त्यातून विस्कळीत झालेला इंधन पुरवठा या दोन रणनीती या युद्धामध्ये निर्णायक ठरल्या. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. इंधनाबरोबरच अन्य व्यापारासाठीही भारत पश्चिम आशियातील देशांवर अवलंबून होता. त्यामुळे, युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यामध्ये अशी परिस्थितीत अर्थव्यवस्थेची कोंडी होऊ नये, यासाठी सर्वच देशांनी अन्य पर्यायांवर चाचपणी घेण्यास सुरुवात केली. यातून भारताच्या आयात-निर्यातीच्या यादीतील देशांच्या क्रमवारीमध्येही बदल झाल्याचे दिसून येते.