india weather forecasting technology advancements
Esakal
अनुपन काश्यपि
भारतीय हवामान खात्याने गेल्या दशकात तंत्रज्ञान, संशोधन आणि तज्ज्ञांच्या साहाय्याने हवामानाचा अचूक वेध घेण्याच्या क्षमतेत विलक्षण झेप घेतली आहे. उपग्रह निरीक्षण, रडार नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुपर कॉम्प्युटर या साधनांचा कुशल वापर करून आज ते पावसाचा इशारा, चक्रीवादळाचा वेग, त्याचा मार्ग आणि गारपिटीचा अंदाजही अधिक विश्वासार्हपणे सांगत आहेत. भारतीय हवामान विभागाने साधलेल्या या सीमोल्लंघनाचा घेतलेला मागोवा....
हवामान हा केवळ सूर्यप्रकाश, वारा, पाणी आणि आकाश यांचा खेळ नसतो; तो पृथ्वीवरील असंख्य घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परसंवादातून घडणारा अद्भुत प्रयोग आहे. पाऊस, चक्रीवादळे, कमी दाबाचे पट्टे, ऊन-सावली हे सर्व हवामानाच्या अफाट कॅनव्हासवरील रंग आहेत.