Alaknanda Galaxy
esakal
Premium|Alaknanda Galaxy : विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलणार? 'अलकनंदा' दीर्घिकेने खगोलशास्त्रातील जुन्या समजुतींना दिला धक्का!
सम्राट कदम
भारतीय शास्त्रज्ञांनी सुमारे १२ अब्ज वर्षांपूर्वीची दीर्घिका शोधली आहे, ती दिसायला आपल्या आकाशगंगेप्रमाणेच सर्पिलाकार (स्पायरल) आहे. महास्फोटानंतर (बिग बँग) विश्वाचे वय अवघे १.५ अब्ज वर्षे असताना विकसित झालेल्या या दीर्घिकेने विश्वाच्या निर्मिती व विकासाबद्दल आजवरच्या समजुतींना धक्का दिला आहे. शास्त्रज्ञांनी ‘अलकनंदा’ असे नामकरण केलेली ही दीर्घिका विश्वनिर्मितीच्या ज्ञानगंगेत एक नवा प्रवाह निर्माण करेल एवढे नक्की...
अंधाऱ्या रात्री चांदण्यांनी लखलखणारे आकाश आपल्याला विश्वाच्या निर्मितीची गूढ कथा सांगत असते. म्हणूनच आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी अगदी प्राचीन काळापासून मानव या अवकाशीय भूतकाळाची निरीक्षणे घेत आला आहे. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील हजारो वर्षांपूर्वीची गुहाचित्रे असोत अथवा अगदी चार वर्षांपूर्वी अवकाशात झेपावलेल्या आणि पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर भ्रमण करणाऱ्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने पाठविलेल्या प्रतिमा असोत... उद्देश एकच - हे विश्व कसे निर्माण झाले आणि आपण इथे काय करतो आहोत, याचा शोध घेणे! गंमत म्हणजे आपल्याला आकाशात जे काही दिसते, ते सर्व घडून गेलेले असते. कारण त्यातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाला आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो नव्हे तर अब्जावधी वर्षांचा प्रवास करावा लागणार असतो. एकप्रकारे विश्वाचा भूतकाळच आकाशाच्या पटलावर मांडलेला असतो.

