

Importance of Grassroots Football Development
esakal
किशोर पेटकर
भारताच्या राष्ट्रीय संघाला दर्जेदार फुटबॉलपटू देऊ शकणाऱ्या आयएसएल स्पर्धेचा भर पायाभूत विकासावरही होता. मात्र मागील चार वर्षांतील प्रशासकीय घोळामुळे आयएसएल स्पर्धा आता कोमेजू लागलीय. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिवपद मानद नाही, तर ते पूर्णवेळ आहे.
दर चार वर्षांनी विश्वकरंडक फुटबॉलचे वारे वाहू लागले, की भारतीय संघ या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या मैदानात का नाही, या प्रश्नाच्या उत्तरासाठी शोधाशोध सुरू होते. विश्वकरंडक स्पर्धा संपली, की पुन्हा फुटबॉलचा विसर पडतो. गेली कित्येक वर्षे हे असेच घडत आहे, पण दुर्दैवाने त्यात बदल होत नाही. देशातील फुटबॉल एकाच जागी आहे, येथील फुटबॉलचा दर्जा उंचावत नाही, खेळाडूंवर मर्यादा येतात. ऑस्ट्रेलियन अँग्लो-इंडियन रायन विल्यम्स याच्यासारख्या तिशी उलटलेल्या फुटबॉलपटूला भारतीय नागरिकत्व बहाल करून राष्ट्रीय संघातून खेळविले जाते. भारतीय वंशाचे फुटबॉलपटू इतर देशांत कोठे खेळत आहेत का, याचा शोध अजूनही सुरू आहे. आयात खेळाडूंसाठी शोधाशोध करण्याऐवजी देशातील फुटबॉल गुणवत्तेचा पाया भक्कम करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. हमखास गोल करणारा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याला पर्यायी आघाडीपटू अजूनही सापडलेला नाही. त्यामुळेच जून २०२४मध्ये निवृत्त झाल्यानंतर वयाच्या चाळिशीत त्याला मार्च २०२५पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानात उतरावे लागले.