Premium|Indian Parents Abroad : मुलांसाठी परदेशात गेल्यावर...

Life After Retirement : मुलांच्या प्रेमापोटी आई-वडील अमेरिकेत किंवा कॅनडात स्थलांतरित होतात; मात्र नव्या देशातील एकटेपणा, भाषेची अडचण आणि बदललेली जीवनशैली स्वीकारताना त्यांच्या मनात वेगळे प्रश्न निर्माण होतात.
Indian Parents Abroad

Indian Parents Abroad

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

आई-वडील दोघेही जिवंत असतानाच मुलं त्यांना अमेरिकेत किंवा कॅनडात कायमचं आणायचं ठरवतात. त्यातील काही आई-वडील स्वखुशीनं येतात, तर काही मुलांच्या सोयीसाठी हे स्वीकारायचं ठरवतात. मुलांनी आपल्यावरच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे, याचीदेखील त्यांना जाणीव असते. ते काहीही असलं, तरी सुरुवातीची नवलाई काही काळानं संपते आणि मग आता इथं आयुष्य कसं काढायचं असा प्रश्‍न पडतो.

अमेरिकेत आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या व्यायाम आणि क्लब हाऊसमध्ये एका भारतीय महिलेची ओळख झाली. ती हिंदीत बोलू लागली. मी माझं हिंदी (फाडायला) सुरू केलं. तिला इंग्लिश जेमतेम कळत होतं. त्यामुळे कोणीतरी ‘आपलं’ भेटल्याचा तिला आनंद झाला होता. आम्ही रोज संध्याकाळी एकत्र चालायला जाऊ लागलो. उत्तर प्रदेशातल्या खेडेगावात वाढलेली पण बीए झालेली ही निशा. एका इंजिनिअरसोबत तिचा छान संसार सुरू होता. घरी नोकर-चाकर, सद्‌गुणी मुलं. चांगली शिकलेली. त्यातला एक अमेरिकेत स्थायिक झाला होता. आई-वडिलांच्या निवृत्तीनंतर तो त्यांना अमेरिकेत घेऊन येऊ लागला. त्यांनाही आता इथलं जीवन चांगलं परिचयाचं झालं होतं. नवरा गेल्यावर त्या मुलानं ठरवलं, की आता आईला कायमचं अमेरिकेत घेऊन यायचं. तिचं ग्रीन कार्ड करून घ्यायचं. म्हणजे काही काळजीच नसेल आणि आईला काही झालं तर त्यासाठी भारतात धावायला नको.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com