

Space Agriculture India
esakal
‘जमिनीत रुजवलेले बी आकाशाकडे झेपावते,’ असे आपण नेहमी ऐकतो आणि पाहतो. सृष्टीचा हा नियम आपल्याला अगदी स्वाभाविक वाटतो. पण विज्ञानाच्या प्रगतीने आता या नियमाला नवी दिशा दिली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी चक्क अंतराळात जोपासलेले बी आता महाराष्ट्राच्या मातीत रुजवले आहे. भारताच्या अंतराळ युगाचे हे दर्जेदार बियाणे संशोधनाच्या कसदार मातीमध्ये रुजत असून, भविष्यातील ‘स्पेस फार्मिंग’ची मुहूर्तमेढ रोवत आहे. पुणेस्थित शास्त्रज्ञांची ही मुलखावेगळी आणि विज्ञानाचे परीघ ओलांडणारी शेती सविस्तर जाणून घेऊ या.