Womens cricket
Esakal
संपादकीय
महिला सर्वच क्षेत्रांत प्रगती करीत आहे आणि त्याला खेळांचे विश्वही अपवाद नाही. भारतीय महिलांनी नुकतीच जिंकलेली क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा त्याचे ताजे उदाहरण. संघर्षपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत हरमनप्रीत कौरच्या संघाने करंडक पटकावला. या स्पर्धेतील भारताचा प्रवास अनेक खाचखळग्यांची भरलेला होता. स्पर्धेतील चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाचा आलेख खालावला. लागोपाठच्या तीन पराभवांनतर भारत सुपर फोरमध्ये स्थान मिळवणार का, याबद्दल शंका निर्माण झाली.
भारताने सुपर फोरमध्ये संघर्षपूर्ण प्रवेश मिळवला व त्याबरोबरच स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या व एकही सामना न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला उपांत्यफेरीत धूळ चारली. हा सामना जेमिमा रॉड्रिग्जने गाजवला. संघाची गरज ओळखून शतकी खेळी करत तिने भारताला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवून दिला व नंतर भारतीय महिलांनी घडवलेला इतिहास आपण जाणतोच. हा विजय महिला क्रिकेटबरोबरच इतर सर्वच खेळांतील महिला खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरावा.