River Linking Project: केन-बेतवा नदी जोड प्रकल्प

Ken-Betwa Link Project : देशातील या पहिल्या नदी जोड प्रकल्पाला ₹ ४५ हजार कोटी इतका खर्च अपेक्षित
Ken-Betwa Link Project
Ken-Betwa Link ProjectEsakal
Updated on

केदार देशमुख

भारतातील नद्यांची खोरी जोडण्याचा विचार प्रथम सन १८५८मध्ये केला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिश इंजिनिअर सर आर्थर थॉमस कॉटन यांनी त्यावेळी गोदावरी व कृष्णा नद्या जोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ सर एम. विश्वेश्वरय्या यांनी हा विचार पुढे नेला. पुढे १९७०-८०च्या दशकात के. एल. राव आणि कॅप्टन दिनशा जे. दस्तूर यांनी नदी जोड प्रकल्पाच्या संकल्पनेचा विस्तार केला.

देशातील पहिल्या नदी जोड प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ डिसेंबर २०२४ रोजी झाली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनाचे (२५ डिसेंबर) औचित्य साधून या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com