क्रीडांगण: किशोर पेटकर
या वर्षाची सुरुवात भारतीय बुद्धिबळासाठी आश्वासक ठरली. डी. गुकेशच्या गतवर्षीच्या ऐतिहासिक जगज्जेतेपदानंतर आता आर. प्रज्ञानंदने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ‘विशीची मुलं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या दमाच्या खेळाडूंच्या यशस्वी प्रवासामुळे भारतीय बुद्धिबळाच्या भविष्याबाबत अपेक्षा आता अधिकच वाढल्या आहेत.