

Importance of Cultural Heritage Studies
esakal
भारतविद्या क्षेत्रातील पारंपरिक शिक्षण पर्यायही महत्त्वाचे आहेतच. नेहमीप्रमाणे एम.ए. आणि पीएच.डी. करून भारतातील किंवा परदेशातील महाविद्यालयांत किंवा संशोधन संस्थांमध्ये व संशोधन प्रकल्पांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. ॲनिमेशन, फिल्म मेकिंग, आर्ट डायरेक्शन, सुव्हनिअर प्रॉडक्शन, अँटिक कलेक्शन, कॉइन्स कलेक्शन, इंटेरिअर डिझायनिंग, ज्वेलरी किंवा कॉस्च्युम डिझायनिंग यांसारख्या क्षेत्रातही भारतविद्या अभ्यासाचे महत्त्व अपरंपार आहे.
सर्व जगाला भुरळ पाडणाऱ्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास म्हणजे ‘भारतविद्या’ (इंडॉलॉजी - एन्शंट इंडियन हिस्टरी ॲण्ड कल्चर). जगातील अतिशय महत्त्वाच्या संस्कृतीची आणि वारशाची ओळख करून घेण्यासाठी निरनिराळ्या देशांमधून लोक येथे येतात. पण आपल्या देशातील लोक अजून प्राचीन इतिहास आणि संस्कृती यांचा अभ्यास करताना फारसे दिसत नाहीत. शाळेत इतिहास हा एक कंटाळवाणा विषय म्हणून प्रसिद्ध असला, तरी तो किती मनोरंजक असू शकतो हे भारतविद्या आणि पुरातत्त्वशास्त्र (आर्किऑलॉजी) या अभ्यासक्रमांमधून समजते. पदविका (डिप्लोमा) आणि पारंगत (एम.ए.) या अभ्यासक्रमांमधून या विषयाच्या खोलीचा अंदाज येतो.