Premium|Economics Concepts Explained : महागाई म्हणजे नेमकं काय?

Inflation and Savings Impact : १०० रुपयांत पूर्वी मिळणारा आठवड्याचा भाजीपाला आता दोन दिवसांनाही पुरत नाही. वस्तू महाग झाल्या आहेत की रुपयाचे खरेदीमूल्य घटले आहे? बचतीचा खरा अर्थ आणि महागाईचा तुमच्या खिशावर होणारा परिणाम समजून घ्या या विशेष लेखातून.
Economics Concepts Explained

Economics Concepts Explained

esakal

Updated on

अर्थशास्त्राच्या परिघातल्या काही संज्ञा अनेकदा आपल्या कानांवर पडलेल्या असतात. आपण रोजच्या आयुष्यात त्या वापरतही असतो. पण अनेकदा त्या संज्ञांचा ‘अर्थ’ आणि त्या आपल्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम करतात, हे आपल्याला सहजी समजत नाही. या सदराच्या निमित्ताने करून घेऊ या अर्थशास्त्रातल्या काही सोप्या व नेहमीच्या, तर काही क्लिष्ट पण महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख...

काही वर्षांपूर्वी केवळ १०० रुपयांत आठवड्याचा भाजीपाला मिळायचा. आज तितक्याच पैशांत दोन-तीन भाज्या घेतानाही विचार करावा लागतो, हा अनुभव आपल्यापैकी जवळपास प्रत्येकानं घेतलेला आहे. इथं एक थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारायला हवा. खरंच सगळं महाग झालं आहे की आपल्या पैशांची किंमत कमी झाली आहे?

अर्थबचतीबद्दल वेळोवेळी चर्चा केली जाते. पण बचतीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर एक मूलभूत गोष्ट लक्षात घ्यावी लागते. बचत ही केवळ रकमेची नसते, ती त्या पैशांच्या खरेदीमूल्याचीही असते. आणि हे खरेदीमूल्य वेळेनुसार, मुख्यतः महागाईमुळे बदलते. आधी १०० रुपयांत दहा वस्तू मिळायच्या, आज सात-आठच वस्तू मिळतात, यालाच आपण पैशाचे कमी झालेले मूल्य म्हणतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com