

Apollo 11 Moon Landing
esakal
आजही कारडॅशियन बाईंना इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ३५ कोटींच्या घरात आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे तिप्पट. इतका व्यक्तीपरिचय देण्याचे कारण हे, की महिनाभरापूर्वी या बाईंनी एका दूरचित्रवाणी कार्यक्रमातून जाहीर केले, की अमेरिकेने चंद्रावर मनुष्य उतरवला ही लोणकडी थाप आहे. तसे काहीही झालेले नाही. आता अशी प्रभावशाली व्यक्ती जेव्हा ‘मून लँडिंग’ हे ‘होक्स’ आहे, ती थाप आहे असे म्हणते, तेव्हा त्यावर अनेकांचा विश्वास बसतो वा असलेला विश्वास दृढ होतो. या षड्यंत्र सिद्धांताबाबतही तेच होण्याचे भय आहे.
किम कारडॅशियन हिच्यासारखी मंडळी चांद्रवारी नाकारताना दिसत आहेत. चंद्रावर डाग असतात. या लोकांच्या मते नासाच्या चांद्रवारीवरही कारस्थानाचा डाग आहे. हा त्यांचा सिद्धांत नेमक्या कोणत्या पायावर, तर्कांवर, पुराव्यांवर उभा आहे हे पाहिले, की षड्यंत्र सिद्धांतांची अभियांत्रिकी आपसूक लक्षात येईल...