

Women Farmers Contribution
sakal
संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. शेती व अन्न प्रणालींमधील महिलांच्या मोलाच्या, पण दुर्लक्षित योगदानाची दखल घेण्यासाठी आणि विषमता दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हे वर्ष महिला शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांना भेडसाविणाऱ्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधणे, धोरणात्मक सुधारणांना चालना देणे आणि गुंतवणूक वाढवणे, ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.