अपूर्वा जोशी / सारंग खटावकर
सध्याचे जग हे माहितीचे जाळे आहे तरीही त्यात पैसा हीच महत्त्वाची संपत्ती आहे. माहिती-तंत्रज्ञानाने पैशांचे व्यवहार करणे हे आता खूप सोपे झाले असले, तरी संयम आणि सदसद् विवेकबुद्धी ही दोन साधने वापरून ऑनलाइन फसवणुकीपासून आपल्या संपत्तीचे रक्षण करणे महत्त्वाचे ठरते.
गुंतवणुकीसंदर्भातील फसवणूक अनेक प्रकारे, अनेक पद्धतींनी घडत असते. गुंतवणूकदारांना फसवून त्यांचे कष्टाचे पैसे चोरण्यासाठी प्रत्येक क्लृप्ती डिझाईन केलेली असते. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची काही नेहमीची उदाहरणे पाहूयात.