Premium|Share Market: शेअर बाजारात नवे आव्हान; ट्रम्प-मोदी गणित आणि गुंतवणूकदारांची फरफट

US-India Relations: नव्या भागविक्रीत संयमाची गरज; ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे गुंतवणूकदार चिंतेत
Us india relation share market

Us india relation share market

Esakal

Updated on

अर्थविशेष । भूषण महाजन

नव्या भागविक्रीत नशीब जोखू पाहणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, की हा दोन घडीचा डाव आहे. सूचीबद्ध होतानाचा दिवस सोडला, तर अर्ध्याहून अधिक नवे इश्यू तोंडावर आपटतात. नव्या भागविक्रीत चटकन नफा होईल या अपेक्षेने धडक मारून पैसे गुंतवण्याची ऊर्मी दाबता आली तर दाबावी. लिस्टिंग गेनच्या मोहात पडणे टाळता आले तर भांडवल खेळते राहील.

बायको आणि आई ह्यांच्या जुगलबंदीत अडकलेल्या मध्यमवर्गीय नवऱ्याची अवस्था आपणा सर्वांना ठाऊक आहे. बायकोचे ऐकावे तर आई रागावते आणि आईचा मान राखावा तर बायको रुसून बसते. बरं, तिच्यावर रागावतही येत नाही. मूग गिळून बसावे लागते आणि संसार साजरा करावा लागतो. अगदी तशीच अवस्था आजच्या काळात देशाच्या धोरणकर्त्यांची झाली आहे. अमेरिकेला बरे वाटावे म्हणून रशियाकडची तेल खरेदी कमी केली, त्यांची नाराजी अजून कळली नाही, कारण अजून रशियातर्फे काही पावले उचलली गेली नाहीत.

ट्रम्प प्रशासनदेखील फारसे उत्सुक व उत्साही वाटले नाही. आपण रशियाकडून खनिज इंधन सोडल्यास, खते (रशिया खनिज खतांचा जागतिक पुरवठादार आहे), शस्त्रास्त्रे (किंवा त्यांचे सुटे भाग), मौल्यवान धातू आणि मौल्यवान रत्ने, प्राणी आणि वनस्पती चरबी आणि विविध प्रकारची वनस्पतिजन्य तेले आयात करतो. इतर आयातींमध्ये यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे आणि युरेनियम मुख्य आहेत. खनिज तेलाची आयात कमी केल्यास आपल्याला इतर आयात वाढवावी लागेल. त्यावरही कदाचित अमेरिकेची संक्रांत येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com