

Stock Market Consolidation Strategy
esakal
भूषण महाजन
ग्राहकवर्ग वाढता आहे आणि कंपनीचे मार्जिन गेल्या चार वर्षांत १४ टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर गेले आहे. कॅश फ्लो सुदृढ आहे. आपल्या रडारवर हा शेअर असला पाहिजे. हा काही गुंतवणुकीचा सल्ला नव्हे. आपल्या सल्लागाराला विचारून निर्णय घ्यावा. याखेरीज हॉस्पिटल उद्योगाला कुठल्याही टॅरिफची अडचण नाही.
श्री मदभग्वद्गीतेनुसार, ज्याची बुद्धी सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय आणि सर्व प्रकारच्या इच्छा-आकांक्षांमध्ये स्थिर राहते, त्याला ‘स्थितप्रज्ञ’ म्हणतात. असा पुरुष आत्म्यात संतुष्ट असतो, इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि परिस्थितीनुसार ढळत नाही. ही मानसिक स्थिरतेची सर्वोच्च अवस्था आहे, जी कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही.