Premium|Iran nuclear ambitions : इराणच्या अणुकार्यक्रमामुळे पश्चिम आशियातील समीकरणे कशी बदलली?

Nuclear Race in West Asia : इराणच्या अणुकार्यक्रमाभोवती पश्चिम आशियातील राजकारण, सुरक्षा आणि सत्तासंतुलन फिरत असून अण्वस्त्र विकासाच्या महत्त्वाकांक्षेमुळे प्रादेशिक तणाव आणि आंतरराष्ट्रीय चिंता सातत्याने वाढत आहेत.
Iran nuclear ambitions

Iran nuclear ambitions

esakal

Updated on

मधुबन पिंगळे

पश्चिम आशियातील युद्ध आणि शांतता चर्चेमध्ये इराणचा अणुकार्यक्रम केंद्रस्थानी आहे. इराणबरोबरच अन्य देशांनीही अण्वस्त्र विकासासाठी प्रयत्न केले, मात्र आंतरराष्ट्रीय दबाव, इस्राईलच्या कारवाया आणि तंत्रज्ञानातील मर्यादा यांमुळे या देशांना यश आले नाही. मात्र, अण्वस्त्र विकासाची महत्त्वाकांक्षा कायम आहे, हेच दिसून येते.

अमेरिका आणि इस्राईलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला आणि पश्चिम आशियातील युद्धाला तोंड फुटले. याआधीही या दोन्ही देशांनी गेल्या वर्षी जूनमध्ये १२ दिवस इराणवर हल्ले केले होते. या दोन्ही हल्ल्यांवेळी आणि शस्त्रसंधीनंतर शांतता करारासाठी होत असलेल्या चर्चांमध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) बराकाह येथील अणुप्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला. त्यामुळे, पश्चिम आशियासाठी नागरी आणि लष्करी असे दोन्ही अणुकार्यक्रम कायम चर्चेत राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय दबाव, मर्यादित तंत्रज्ञान व मनुष्यबळाचा अभाव यांमुळे गुंतवणुकीची क्षमता असतानाही या विभागातील इराण, इराक, सीरिया, सौदी अरेबियासह उत्तर आफ्रिकेतील लीबिया अशा अनेक देशांची अण्वस्त्रांची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे. त्याचवेळी यातील काही देशांनी अणुतंत्रज्ञानाच्या तस्करीचे केलेले प्रयत्नही वादात सापडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com