

Iran-US Tensions and Indian Markets
esakal
भूषण महाजन
इराण आणि अमेरिकेच्या अधूनमधून अंगात येणारच आहे. त्या निमित्ताने बाजार थोडा तरी वर-खाली होणारच आहे. पण जोपर्यंत खनिज तेल ९० डॉलरच्या खाली किंवा आसपास आहे, तोपर्यंत आपला शेअर बाजार या घटना तटस्थपणे पाहील, असे दिसते. कारण परदेशी संस्थांच्या खरेदीची कुमक आपल्याकडे असेल. धातू उद्योगाचे आपण गेले वर्षभर कौतुक केले, त्याप्रमाणे तो निर्देशांकही ४० टक्के वाढला.
डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेली हू मूव्ह्ड माय चीज? ही रूपक कथा आपल्या आयुष्यात बदल कसे अपरिहार्य असतात आणि त्यांना यशस्वीपणे तोंड कसे द्यायचे असते, हे सांगते. या कथेत स्निफ व स्करी हे दोन उंदीर आणि हेम व हॉ ही माणसे आहेत. या चौघांना अतिशय आवडणारे व त्यांच्या राहत्या घराजवळच मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे चीज एके दिवशी अचानक गायब होते. त्यानंतर हेम आणि हॉ ही माणसे नुसतीच चिडचिड करतात, पण स्वस्थ बसून राहतात. मात्र स्निफ आणि स्करी हे दोघे चीज नाहीसे होणे मान्य करून, प्रयत्नपूर्वक नवीन चीजचा साठा शोधून काढतात. आपला शेअर बाजार असाच आहे. बोलता बोलता संदर्भ बदलतात, नवनवी क्षेत्रे पुढे येतात, आपली चाल बदलावी लागते व आपले चीज शोधून काढावे लागते!
दोनच सप्ताहांपूर्वी द. कोरिया व तैवानचे शेअर बाजार कसे धडाडून खाली आले, हे आम्ही सांगितले. ११८२७ अंशाचा उच्चांक करून कॉस्पी ४४ टक्के खाली पडला. तो मागच्या शुक्रवारी (ता. २४ जुलै) पुन्हा २१ टक्के वाढला खरा, पण आता तिथला मोसम संपत आला आहे, हे परदेशी संस्थांना कळले आणि ते भारतीय बाजाराकडे वळले. आपला बाजार चांगले कंपनी कामकाज घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तयारच होता. त्याचा परिणाम ३१ जुलैला संपलेल्या सप्ताहात दिसून आला.