Premium|Ancient Indian Botany and Tree Names : वृक्षांच्या ऐतिहासिक संदर्भांचा शोध घेणारे अरुंधती वर्तक यांचे पुस्तक

Sanskrit Literature and Nature : नद्यांनी वृक्षांच्या मुळांना आधार दिला अन् वृक्षांनी मानवाला! संस्कृत साहित्यातील वृक्षांचे ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संदर्भ उलगडणारा अरुंधती वर्तक यांचा हा ग्रंथ अभ्यासाचा एक अमूल्य दस्तऐवज ठरत आहे.
Sanskrit Literature and Nature

Sanskrit Literature and Nature

esakal

Updated on

गोपाळ कुलकर्णी

आज इंटरनेटमुळे माहितीचा खजिनाच आपल्यासमोर खुला झाला असताना, या जाळ्यातही कधीच आढळून न येणाऱ्या वृक्षांची नावे आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. या ग्रंथातील तळटिपांचा अभ्यास केल्यानंतर लेखिकेने किती सखोलपणे या क्लिष्ट विषयाची नीटनेटकी मांडणी केली आहे, हे दिसून येते. लेखक, अभ्यासक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हा एक उत्तम संदर्भग्रंथ ठरू शकतो.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा विकास वृक्ष आणि नद्यांच्या आधारे झाल्याचा दिसून येतो. नद्यांनी वृक्षांच्या मुळांना आधार दिला अन् वृक्षांनी मानवाला... या झाडांनी आपल्याला काय नाही दिले? फळे-फुले देऊन पोटाची भूक भागवली, संकटाच्या काळात हीच झाडे माणसाचा निवारा झाली. ऋषी-मुनींनी या वृक्षांच्या छायेत तप केले. माणसाला स्वयंतेजाची धम्मदीक्षा बोधिवृक्षाच्या छायेतच मिळाली. खरेतर ‘वृक्ष’ हेच माणसाचे सोबती म्हणावे लागतील. अशा या प्रामाणिक मित्रांच्या कुलवंशाचा वेल मांडणारे अनोखे पुस्तक वाचकांच्या भेटीला आले आहे. अरुंधती वर्तक यांचा काही प्राचीन संस्कृत वृक्षनामांची रहस्ये हा केवळ ग्रंथ नाही, तर तो वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दस्तावेज ठरतो, म्हणूनच तो वाचनीय आणि संग्राह्य झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com