Premium|Jamun Honey Benefits : सह्याद्रीचे मधही सरस!

NCL Jamun Honey Research : एनसीएलच्या संशोधनातून जांभूळ मधातील वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्म स्पष्ट झाले असून भारतीय मधाची अस्सलता, गुणवत्तानियंत्रण आणि आरोग्यदायी उपयोगांना वैज्ञानिक आधार मिळाला आहे.
Jamun Honey Benefits

Jamun Honey Benefits

esakal

Updated on

सम्राट कदम

आयुर्वेदात मधाचा उल्लेख केवळ गोड पदार्थ म्हणून नव्हे, तर औषधी गुणधर्म असलेले नैसर्गिक द्रव्य असाही आढळतो. आयुर्वेदात मधाला ‘योगवाही’ म्हटले आहे. म्हणजे इतर औषधी घटकांचे गुण शरीरात पेशी स्तरापर्यंत पोहोचवण्याची क्षमता मधात असल्याचे मानले जाते. जांभुळाचे वर्णन आयुर्वेदात मूत्रविकार नियंत्रित करणारे उपयुक्त फळ म्हणून केले जाते. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने सह्याद्रीतील जांभूळ मधाचे वैज्ञानिक विश्‍लेषण केले आहे, त्याविषयी...

जांभळाचे झाड हे भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर आढळते. आयुर्वेदात जांभूळ आणि त्याच्या बियांच्या चूर्णाचा वापर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे केला जातो. त्यामुळेच जांभळाच्या फुलांमधील रसापासून मधमाश्यांनी तयार केलेला ‘जांभूळ मध’ हा धुमेहींसाठी किंवा आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर असावा, अशी एक पारंपरिक धारणा होती. मात्र, या धारणेला ठोस विज्ञानाचा आधार देण्याचे काम एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

जांभूळ मधातील काही वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्म प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पष्ट झाले आहेत. त्याचबरोबर भारतीय मधाची अस्सलता सिद्ध करण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धतही विकसित करण्यात आली आहे. या संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे ते केवळ जांभूळ मधाच्या पोषणमूल्यांपुरते मर्यादित नाही. हा अभ्यास भारतीय मधाच्या गुणवत्तेचे नियंत्रण, भेसळ प्रतिबंध, ग्राहक संरक्षण, निर्यात आणि भविष्यातील अन्नसुरक्षा या सर्वच क्षेत्रांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

डॉ. उदय किरण मरेली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर परिसरातून संकलित केलेल्या ८२ अस्सल जांभूळ मधाच्या नमुन्यांचा अभ्यास केला. या अभ्यासात स्नेहल सदाशिव वाघोळे, शिरीन हॅना मॉन्सी आणि सपना रवींद्रनाथन यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. महाबळेश्‍वर हा जैवविविधतेने समृद्ध प्रदेश आहे. जांभूळ वृक्षांच्या फुलांवर मधमाश्या मोठ्या प्रमाणावर परागसंकलन करतात. त्यामुळे या परिसरात मिळणारा जांभूळ मध रासायनिकदृष्ट्या वेगळा असण्याची शक्यता संशोधकांनी गृहीत धरली आणि त्याची पडताळणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com