
क्लेव्हरबॉट हा आपल्या प्रश्नांना उत्तरं देणारा, आपल्याला हवी ती माहिती मिळवून देणारा एक चॅटबॉट. आपल्याकडे ‘धोक्याचं’ मानलं जाणाऱ्या सोळाव्या वर्षांत पदार्पण केलेल्या क्लेव्हरबॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हा सुरुवातीच्या काळातला असला तरी तो प्री-प्रोग्रॅम्ड नव्हता.
त्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून तो शिकत राहतो. आयआयटी, गुवाहाटीने २०११मध्ये आयोजित केलेल्या टेक्निक या तंत्रज्ञान महोत्सवात क्लेव्हरबॉट ट्युरिंग टेस्टमध्ये सहभागी झाला होता, आणि तेव्हा तो ५९.३ टक्के इतका मानवी ठरला होता.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातले ब्रिटिश संशोधक रोलो कार्पेन्टर हे क्लेव्हरबॉटचे जनक. क्लेव्हरबॉटच्या आधीचा जॅबरवॅकी हा चॅटबॉट प्रोजेक्टही कार्पेन्टर यांचाच. कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेले यंत्रमानव भविष्यात माणसावर मात करतील,