John F. Kennedy Assassination Suspects
esakal
Premium|The JFK Assassination Puzzle : केनेडी हत्येचे गूढ
केनेडी जाऊन दोन दिवस झाले होते. २४ तारखेला ओस्वाल्डला तुरुंगात हलवण्यात येत होते. अचानक एक ‘राष्ट्रभक्त’ पुढे आला आणि त्याने ओस्वाल्डला गोळी घातली. ओस्वाल्ड मेला. त्या ‘राष्ट्रभक्ता’चे नाव जॅक रूबी. एका नाइट क्लबचा मालक होता तो. त्याच्या त्या एका दुष्कृत्याने केनेडींच्या हत्येचा गुंता अधिकच वाढवला.
शुक्रवार. २२ नोव्हेंबर १९६३. सकाळचे ११.४० वाजले होते. डलासमधील ‘लव्ह फिल्ड’ विमानतळावर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे ‘एअर फोर्स वन’ विमान उतरले.
प्रेसिडेंट जॉन एफ. केनेडी आणि त्यांच्या पत्नी जॅकेलिन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी जमली होती. ते दोघेही विमानतळाच्या दरवाजात दिसताच एकच जल्लोष झाला. जमलेल्या लोकांशी हस्तांदोलन करीत ते बाजूलाच उभ्या असलेल्या कारमध्ये बसले. सोबत गुलाबी शनेल सूट आणि पिलबॉक्स हॅट परिधान केलेल्या जॅकेलिन होत्या. ती कार होती लिंकन कॉँटिनेन्टल कन्व्हर्टिबल. खुल्या छताची. अशा गाडीतून राष्ट्राध्यक्षांनी प्रवास करू नये, असे सुरक्षा यंत्रणेतील काहींनी सुचवले. पण केनेडींनी तो सल्ला मानला नाही. पुढे हीच बाब फार महागात जाणार होती...

