Mogara Phulala Marathi book

Mogara Phulala Marathi book

esakal

Premium|Mogara Phulala Marathi book : ‘मोगरा फुलला’ ज्ञानेश्वर अभंगाच्या सुवासात न्हालेला ज्योती कपिले यांचा ललित लेखसंग्रह

Marathi essay literature : ज्योती कपिले यांच्या 'मोगरा फुलला' या ललित लेखसंग्रहामध्ये ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगावरील आध्यात्मिक विवेचनासह वैयक्तिक, सामाजिक, आणि लेखनविषयक अनुभवांचे चित्रण करणारे एकूण ३१ लेख समाविष्ट आहेत.
Published on

डॉ. मधुमंजिरी गटणे

पुस्तकात मोगरा फुलला या सदरात प्रसिद्ध झालेले लेख, तसंच २०२४च्या दिवाळी अंकांत प्रकाशित झालेल्या काही लेखांसह एकूण ३१ लेखांचा समावेश आहे. या सर्व लेखांमधून वैयक्तिक, सामाजिक, लेखनविषयक अनुभव मांडत असताना पुस्तकाचं शीर्षक ठरलेल्या ‘मोगरा फुलला’ या लेखामध्ये ज्ञानेश्वर माउलींच्या मोगरा फुलला या अभंगाचे आध्यात्मिक विवेचन लेखिका करते. हा लेख वाचताना मनाचा गाभारा अतीव आनंदानं भरून गेल्यासारखं वाटतं.

संतांचे अभंग स्वरबद्ध करून घराघरात पोहोचवून ओठाओठांवर रुळवण्याची किमया आधुनिक काळात काही संगीतकारांना साध्य झाली आणि ऐहिकात रमलेल्या लोकांना त्यायोगे आध्यात्मिक, पारमार्थिक तत्त्वाचा पुसटसा का होईना स्पर्श झाला. ज्ञानेश्वर माउलींचा ‘मोगरा फुलला’ हा असाच एक अभंग लोकांच्या मनात लतादीदींच्या आवाजात गेली अनेक दशके दरवळत आहे. अनेक साहित्यिक कृतींनी हेच शीर्षक अभिमानानं धारण केलं. ज्योती कपिले या लेखिकेलाही जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात एका वर्तमानपत्रासाठी सदर लिहीत असताना हेच शीर्षक वापरण्याचा मोह झाला. त्याच सदरातल्या लेखांचं पुस्तक मोगरा फुलला याच नावानं प्रसिद्ध झालं आहे. जे.के. मीडिया या प्रकाशन संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com