

K-Fashion Phenomenon: Trends Dominating Youth Style Globally
Sakal
आपल्या वॉर्डरोबमध्ये थोडासा कोरियन टच आणायचा असेल, तर पेस्टल शेड्समधले ओव्हरसाइज्ड कपडे, चंकी स्नीकर्स आणि मिनिमल ॲक्सेसरीज यांच्यापासून सुरुवात करता येईल. यातूनच तुम्हालाही के-फॅशनचा तो मोहक आणि आत्मविश्वासाने भरलेला लुक मिळेल!
आजच्या आधुनिक युगात फॅशन ही केवळ कपड्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक व्यक्तिमत्त्व व्यक्त करण्याची पद्धत बनली आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक फॅशनजगतात कोरियन फॅशन म्हणजेच के-फॅशन हा एक मोठा ट्रेंड ठरतो आहे. कोरियन ड्रामा, के-पॉप आयडॉल्स आणि सोशल मीडियामुळे या फॅशनचा प्रभाव भारतात आणि विशेषतः आपल्या तरुण पिढीमध्ये झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच जाणून घेऊ या तरुणाईमध्ये पॉप्युलर असलेल्या ह्या कोरियन ट्रेंडबद्दल...
कोरियन फॅशन म्हणजे केवळ ट्रेंड नव्हे, तर ती त्यांची एक संस्कृती आणि जीवनशैली आहे. यात साधेपणा, नाजूक रंगसंगती, कम्फर्ट आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ दिसतो. त्यामुळेच आज जगभरातील तरुण या फॅशनकडे आकर्षित होत आहेत. भारतात कोरियन कपडे, फुटवेअर आणि ॲक्सेसरीज ऑनलाइन स्टोअर्समधून सहज उपलब्ध होत आहेत.
जर तुम्हालाही आपल्या वॉर्डरोबमध्ये थोडासा कोरियन टच आणायचा असेल, तर पेस्टल शेड्समधले ओव्हरसाइज्ड कपडे, चंकी स्नीकर्स आणि मिनिमल ॲक्सेसरीज यांच्यापासून सुरुवात करता येईल. यातूनच तुम्हालाही के-फॅशनचा तो मोहक आणि आत्मविश्वासाने भरलेला लुक मिळेल!