Premium|Immanuel Kant Philosophy : कांट आणि रुसोच्या विचारांमधून आधुनिक राजकारणाची गुंतागुंत कशी उलगडते?

Kant, Rousseau and the Foundations of Modern Political Thought : कांटच्या नीतिशास्त्रीय विचारांपासून रुसोच्या राजकीय प्रभावापर्यंतचा हा वैचारिक प्रवास आधुनिक राजकारण, फ्रेंच राज्यक्रांती, सामूहिक इच्छाशक्ती आणि पुढील इतिहासातील शांततेच्या विचारांची पार्श्वभूमी स्पष्ट करतो.
Kant, Rousseau and the Foundations of Modern Political Thought

Kant, Rousseau and the Foundations of Modern Political Thought

esakal

Updated on: 

डॉ. सदानंद मोरे

प्रमाण विश्वसनीय ज्ञानाच्या बाबतीत कांटने जे केले तसेच त्याने नीतिशास्त्राच्या प्रांतात नैतिक कृतीच्या निर्णयाच्या संदर्भात केले. त्यांच्या या ग्रंथाचे नाव The Critique of Practical Reason. या पार्श्वभूमीवर आता कांट रुसोच्या बाबतीत काय करतो हे पाहायला हवे.

ज्या वैचारिक व राजकीय पार्श्वभूमीवर कांट आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी करीत होता तिचा आणि समकालीन (वा लगतपूर्व होऊन गेलेल्या) विचारवंतांचा नीट अभ्यास केल्याशिवाय त्याचे स्वतःचे विचार आणि योगदान नीट समजून घेता येणार नाही आणि ते समजून घेतल्याशिवाय नंतरच्या इतिहासातील शांतीचे आर्त समजणार नाही, अगदी किसिंजरपर्यंतचे, म्हणूनच हा खटाटोप.

कांटच्या पुढ्यात जणू उभा ठाकलेला बलवान व प्रभावी प्रतिस्पर्धी म्हणजे अर्थातच रुसो हे सांगून झालेले आहे. रुसोच्या हयातीतच त्याचा प्रभाव जगाला समजून चुकला होता. फ्रेंच राज्यक्रांतीचा वैचारिक नायक (आणि खलनायकही) रुसोच होता असे मनापासून मानणारे अभ्यासक अस्तित्वात आहेत. विशेषतः राज्यक्रांतीत जो रक्तरंजित हिंसाचार झाला त्याला जबाबदार असलेला मॅक्समिलन रॉबिनस्पियर रुसोचा कट्टर अनुयायी समजला जायचा. आपले राजकारण रुसोच्या The Social Contractवर आधारित असल्याचा त्याचा दावा होता. रुसो जिला सामूहिक संकल्प किंवा इच्छाशक्ती म्हणतो, तिचे आपणच प्रत्यक्षातील रूप, निदान हस्तक असल्याची त्याची प्रामाणिक समजूत होती. एका बाजूला रुसोच्या ग्रंथातील उतारे उद्‍धृत करीत हा देहधारी समूहसंकल्प क्रांतीविरोधक मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना देहदंडाची शिक्षा देत असे. रुसो त्याच्यासाठी एक दैवी अस्तित्व होते, साधारण व्यक्ती नव्हती. त्याच्या या कृत्यांची परिणती शेवटी त्यालाच मृत्युदंडाची शिक्षा भोगावी लागण्यात झाली. त्याने एक महामानव पंथासारख्या संघटनात्मक संस्थेची उभारणी केल्याचेही नमूद आहे. निदान सुरुवातीच्या काळात तरी नेपोलियनने रॉबिनस्पियर, त्याचा भाऊ ऑगस्टिन आणि त्याची जाकोबियन संघटना यांच्याशी हातमिळवणी केली होती. नंतर त्याचे स्वरूप कळल्यावर म्हणा, किंवा त्याच्या कृत्यांचा आपल्या राजकारणावर लाभदायक परिणाम होण्यापेक्षा हानी होण्याचा संभवत जास्त असल्याचे जाणवल्याने म्हणा, नेपोलियनने या मंडळींशी अंतर राखायला सुरुवात केली. असे असले तरीही रॉबिनस्पियर विरोधकांनी त्याला गिलोटिन दाखवल्यावर नेपोलियनला त्याच्या सहकारी किंवा सहानुभूतीदार समजून दोन आठवडे कोठडीत बंद करून ठेवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com