Premium|Karl Marx Philosophy : इमॅन्युअल कांट आणि कार्ल मार्क्स

Dialectical Materialism : कार्ल मार्क्सवर कांट आणि हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. पुढे फ्यूरबाखच्या विचारांमुळे मार्क्सने आदर्शवाद नाकारून भौतिकवाद स्वीकारला, मात्र हेगेलची द्वंद्वात्मक पद्धत कायम ठेवली.
Dialectical Materialism

Dialectical Materialism

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

मुद्दा सरळ आणि स्पष्ट आहे, कांटचे तत्त्वज्ञान कल्पितात - अलौकिकातले आहे. मार्क्सला इथे आणि आता श्रेयप्रेयसत्याचा शोध घ्यायचा आहे.

कांट आकाशातील चंद्र-ताऱ्यांच्या शोधात, तर मार्क्स ‘ग्राउंड रिॲलिटी’च्या तपासात... पण हे खरे आहे का? मार्क्सने कांटला नीट समजून तर घेतले नाही?

जगाचा इतिहास आणि भूगोल बदलण्याचा पराक्रम ज्यांच्या नावांवर जमा करावा लागतो अशा महानायकांमध्ये कार्ल मार्क्सचा समावेश करावा लागतो. १८१८मध्ये जन्मलेल्या या जर्मन तत्त्ववेत्त्याला कांट, हेगेल, गटे अशा मातब्बरांचा वारसा लाभला होता. इतिहासाला कलाटणी देणारी फ्रेंच राज्यक्रांती या मातब्बरांच्या समोर घडली होती. कांटच्या मोहिमा पाहता आल्या नसल्या, तरी नेपोलियनने युरोप जिंकण्याच्या मोहिमा हेगेलला पाहता आल्या हा इतिहाससुद्धा मार्क्ससाठी फार प्राचीन नव्हता. हेगेलला तर नेपोलियन म्हणजे इतिहासाचेच काय पण इतिहासाच्या आत्म्याचे जणू मानवी अवतरण वाटले. त्याच्या स्वतःच्या जेना या शहरी विजेत्या नेपोलियनने केलेला प्रवेश त्याने अनुभवला. हेगेल आणि गटे एकापाठोपाठ एक निवर्तले (१८३१ आणि १८३२मध्ये) तेव्हा कार्ल मार्क्स विद्यार्थिदशेत होता. गटे त्याचा आवडता कवी होताच; पण हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावर लक्षणीय प्रभाव पडला होता. ज्यांना ‘यंग हेगेलियन’ म्हटले जायचे अशांच्या अभ्यास व कृतिगटात तो त्याच्या तारुण्यात समाविष्ट झाला होता. पुढे विशेषतः फ्यूरबाख या मुळातील हेगेलवादी पण नंतर हेगेलच्या प्रभावातून बाहेर पडलेल्या तत्त्ववेत्त्याच्या संगतीमुळे मार्क्सही तसाच बाहेर पडला. हेगेलच्या चैतन्यवादाला (Idealism) नाकारून भौतिकतावादी होताना मार्क्सने जे काही केले त्याला डोक्यावर उभे करणे म्हणण्याइतपत बदल केला. अर्थात तरीही हेगेलच्या द्वंद्वात्मक (Dialectical) पद्धतीचा मात्र त्याने त्याग केला नाही. म्हणून तर त्याच्या स्वतःच्या भौतिकवादाला द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हटले जाते. अर्थात या झाल्या नंतरच्या घटना. १८३७मध्ये म्हणजे वयाची विशी गाठली तेव्हा मार्क्स उच्च शिक्षणासाठी बर्लिनमध्ये होता. तेथील डॉक्टरांचा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारवंतांच्या समूहाचा तो सर्वांत लहान सदस्य असणार यात शंका नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com