Premium|Kashmir Shikara : काश्मीरचा शिकारा; हस्तकला, संस्कृती आणि पर्यटनाचा अद्वितीय संगम

Kashmir Houseboats : काश्मीरमधील शिकारा आणि हाऊसबोट या केवळ पर्यटनाचे आकर्षण नसून, उत्कृष्ट लाकडी हस्तकला, स्थानिक संस्कृती, जलजीवन आणि पारंपरिक उपजीविकेचे जिवंत प्रतीक म्हणून आजही ओळखले जातात.
Kashmir Houseboats

Kashmir Houseboats

esakal

Updated on

वर्षा गजेंद्रगडकर

कुशल कारागीर शिकाऱ्याच्या लाकडामध्ये सुंदर आकृतिबंध आणि प्रतिमा कोरतात. काश्मीरचं निसर्गसौंदर्य, तिथली धार्मिक प्रतिकं आणि काश्मिरी लोकसाहित्य यातली दृश्यं फार नजाकतीनं लाकडावर कोरली जातात. नाजूक लाकडी कोरीवकाम आणि सुंदर सजावट यांमुळे शिकारा फक्त एक बोट राहत नाही, तर काश्मिरी कारागिरी आणि कलाबुद्धी यांच्या अपूर्व संयोगाची ती साक्ष असते.

काश्मीरचा भूप्रदेश खास कशिदा आणि केशरसाठी तर ओळखला जातोच, त्याचबरोबर तो इथल्या नद्या आणि तळ्यांमुळेही ओळखला जातो. खरंतर काश्मीरचा इतिहास तिथल्या जलाशयांखेरीज पूर्णच होऊ शकत नाही. दल, वुलर आणि निगीन सरोवरांच्या संथ पाण्यावर पिढ्यान्‌पिढ्या डुलणाऱ्या, सुंदर लाकडी कोरीवकाम असणाऱ्या हाऊसबोटींनी काश्मीरची दृश्यओळख निर्माण केली आहे. पर्यटकांच्या मनात या हाऊसबोटींची प्रतिमा तिथं जाण्यापूर्वीपासूनच पक्की झालेली असते. मात्र काश्मीरमधल्या पश्मीना शाली, कशिदाकाम केलेले कपडे आणि साड्यांकडे जसं आपण पर्यटक हस्तकला म्हणून बघतो, तसं सहसा हाऊसबोटींकडे पाहिलं जात नाही. याचं कारण म्हणजे, आपल्या मनानं हस्तकलेभोवती अतिशय नाजूक सौंदर्याचं वलय निर्माण केलेलं असतं. त्यामुळे एखाद्या भव्य, आलिशान घरासारख्या दिसणाऱ्या या हाऊसबोटींमध्ये राहण्याचा आनंद लुटतानाही हस्तकला म्हणून त्यांचा विचार केला जात नाही.

Kashmir Houseboats
Premium|Geopolitics: प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या युद्धकथा, त्यांच्या मरणयातना कोण सांगेल?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com