Premium|Geopolitics: प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या युद्धकथा, त्यांच्या मरणयातना कोण सांगेल?

Environmental Damage: युक्रेन-रशिया संघर्ष; जैवविविधतेवर गंभीर परिणाम
Environmental Damage

Environmental Damage

Esakal

Updated on

वर्षा गजेंद्रगडकर

युद्धग्रस्त देशातल्या आत्ताच्या आणि पुढच्या अनेक पिढ्या युद्धाच्या भळभळत्या जखमा घेऊन जगतील. शिवाय या देशांमधल्या प्रचंड आर्थिक-सामाजिक नुकसानीचा विचारही कल्पनेपलीकडचा आहे. जगाच्या इतिहासात या सगळ्या विध्वंसाची आणि युद्धांत होरपळलेल्या माणसांच्या वेदनांची नोंद होईल, पण ज्यांना वाचा नाही, अशा प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या युद्धकथा, त्यांच्या मरणयातना कोण सांगेल?

राजकीय धोके आणि पर्यावरणीय धोके यांनी एकमेकांच्या हातात हात घालून समोर येण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढत चाललं आहे. नैसर्गिक संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठीची स्पर्धा भूराजकीय ताण अधिक तीव्र करताना दिसते आहे. युद्ध आणि सशस्त्र संघर्ष यांमुळे हवा आणि पाण्याचं प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, लोकसंख्या विस्थापन आणि पर्यावरणाच्या जागतिक प्रगतीचं अधःपतन होत राहतं आणि या सगळ्यामुळे अनेक परिसंस्थाच उद््ध्वस्त होतात. गेल्या तीन वर्षांतल्या तीन युद्धांनी हीच बाब अधोरेखित केली आहे. मुळात जगभरातील हवामान बदलाच्या संकटाची सध्याची स्थिती बघता, मानवजातीपुढचा परतीचा मार्ग आता जवळपास बंद झाला आहे, असंच म्हणायला हवं. त्यात पडणारी युद्धांची भर मानवजातीवर असह्य ओझं टाकणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com