

Easy Snack Recipes
esakal
नीलिमा विजय खडतकर
वाढप - २ ते ३ व्यक्तींसाठी
साहित्य
चार ते पाच जिरे खाकरे, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, १ टीस्पून रॉक सॉल्ट, १ टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून लाल तिखट, प्रत्येकी २ टेबलस्पून खारे शेंगदाणे, मसाला चणा डाळ व बारीक शेव, अर्ध्या लिंबाचा रस, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
कृती
प्रथम खाकऱ्यांचा हाताने चुरा करावा. एका वाडग्यात खाकऱ्यांचा चुरा, कांदा, टोमॅटो व हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. मग खारे शेंगदाणे व मसाला चणा डाळ घालून त्यात लाल तिखट, रॉक सॉल्ट, चाट मसाला घालावा. वरून लिंबाचा रस व शेव घालून मिश्रण छान एकजीव करावे. चटपटीत खाकरा भेळ तयार.