Premium|Lakshmanresha Serial : कबड्डीनं वेडावलेला सदाशिव...

Shashank Solanki Roles : ‘लक्ष्मणरेषा’ मालिकेतील सदाशिव जगदाळेची भूमिका आधी नाना पाटेकरांसाठी चर्चेत होती; मात्र निर्माते शशांक सोळंकींच्या आग्रहामुळे ती भूमिका वेगळ्या अभिनेत्याच्या वाट्याला आली.
Lakshmanresha Serial

Lakshmanresha Serial

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

अंतिम सामन्यात मालिकेतल्या हिरॉइन्स जिंकतात आणि समोरची टीम हरते असा सीन... काही केल्या हिरॉइन्स जिंकेनात... कारण समोर खऱ्या खुऱ्या खेळाडू... त्यांना हरणं काही जमेना... कारण खऱ्या खेळाडूंना कधी हरायचं शिकवलेलंच नसतं.. जिंकण्यासाठीच त्यांच्या पायाला माती लागते.. त्यांची समजूत घातली... हरा म्हणून विनंती केली... अखेर हिरॉइन्स जिंकल्या, तेव्हा खऱ्या खेळाडू खेळ खोटा असला तरी ‘हरलो’ म्हणून रडत होत्या...

हा रोल आधी कोण करणार होते माहीतये ? नाना पाटेकर... त्यांच्याच नावाची चर्चा सुरू होती पण नाना पाटेकर करतील की नाही.... ही शंका होतीच. त्यात ते टीव्ही सीरियल करतील की नाही असाही विषय झाला आणि मग अनेक नावांवर चर्चा झाली.... मग मी तुझं नाव पुढे केलं. चॅनल आधी नाही म्हणत होतं. मग त्यांना पटवून दिलं आणि तुझी या सीरियलमध्ये मी वर्णी लावली.

‘लक्ष्मणरेषा’

ही मालिका बऱ्याच वर्षांपूर्वी झी टीव्हीवर आली होती. शंभरच एपिसोड करायचं म्हणून तयार केलेलं एक कॅप्सुल असा त्याचा फॉरमॅट होता.

त्या मालिकेतल्या सदाशिव जगदाळे तथा भानू जगदाळे या भूमिकेच्या पात्र योजनेच्या निमित्ताने जी चर्चा झाली त्यातला अंश मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी मला सांगत होते.

शशांक सोळंकीने कायमच माझ्यासाठी वैशिष्‍ट्यपूर्ण आणि आपल्याला हे जमेल का? अशा वाटायला लावणाऱ्या भूमिका मला दिल्या. ते करताना प्रसंगी त्यांनी व्यवस्थापनाशी वाद घातलेला आहे. त्याच्या आणि माझ्या ऋणानुबंधावर पुढं सविस्तर येईलच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com