Premium|Future of Digital Finance : भारतीय बँकिंग क्षेत्रात एआयचा वेगवान विस्तार; अर्थव्यवस्थेसाठी वरदान

AI in Banking : बँकिंग क्षेत्रात १९५० पासून सुरू झालेला एआयचा प्रवास आज मोबाईल बँकिंग आणि चॅटबॉट्सपर्यंत पोहोचला आहे. सुरक्षित व्यवहार, जलद कर्जमंजुरी आणि वैयक्तिक आर्थिक सल्ल्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कशी वरदान ठरत आहे, याचे सविस्तर विश्लेषण वाचा.
Future of Digital Finance

Future of Digital Finance

esakal

Updated on

विक्रम अवसरीकर

बँकिंग क्षेत्रात एआयचा प्रवास १९५०च्या दशकापासून सुरू होऊन आज एका अपरिहार्य तंत्रज्ञानापर्यंत पोहोचला आहे. जागतिक पातळीवर काही बँका एआयचा वापर करून ग्राहक सेवा, सुरक्षा आणि कार्यक्षमता यांमध्ये अभूतपूर्व सुधारणा घडवून आणत आहेत. भारतात यूपीआय, डिजिटल इंडिया आणि फिनटेक क्षेत्रांच्या वाढीमुळे एआयचा वापर आणखी वेगाने वाढेल, हे निश्‍चित आहे. या तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर केल्यास ते अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरेल.

तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्र गेल्या काही दशकांत प्रचंड बदलले आहे. एकेकाळी बँकिंग म्हणजे फक्त बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन व्यवहार करणे, पासबुक अपडेट करणे आणि कागदपत्रांची पडताळणी करणे एवढ्यापुरतेच मर्यादित होते. आज मात्र मोबाईल बँकिंग, डिजिटल पेमेंट्स, रिअल टाइम व्यवहार आणि वैयक्तिक आर्थिक सल्ले देणाऱ्या प्रणाली या सगळ्यांमागे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. बँकिंग क्षेत्रात एआयचा वापर अचानक सुरू झाला नाही, तो गेल्या अनेक दशकांत टप्प्याटप्प्याने विकसित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com