Premium|Ladakh Travel : अहाहा! लडाख!

What Makes Ladakh Unique : लेहच्या शिस्तबद्ध शहरापासून उंच डोंगररांगा, वितळणारा बर्फ, खळखळणाऱ्या नद्या आणि हिरवाईने नटलेल्या लडाखचा निसर्ग प्रवाशांना अनोखा अनुभव देतो. Leh
Ladakh Travel

Ladakh Travel

esakal

Updated on

गौरी सहस्रबुद्धे

लेह तसे मोठे आणि टुमदार व स्वच्छ शहर. हे शहर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. लेह भारतीय सैन्याच्या अखत्यारित असल्याने येथे शिस्तीचे वातावरण दिसते. लेह मार्केटदेखील आखीव आणि देखणे आहे. येथील विमानतळ भारतीय सैन्याला अंतर्गत सेवा पुरवते. येथे वळणावळणावर स्मृतीप्रित्यर्थ, विजयार्थ किंवा स्वागतार्थ बांधलेले छोटे स्तूप दिसतात.

जून महिना सुरू होताच वितळणारा बर्फ, खळखळ वाहत जाणाऱ्या सिंधू, झंस्कार, सुरु, श्योक, द्राससारख्या नद्या, तपकिरी रंगाचे उंच डोंगर, त्यांमधून जाणाऱ्या पायवाटा आणि रस्ते, जागोजागी पसरलेली हिरवळ, बर्फाचे पांढरे कडे, रंगीत फुलांची मधूनच डोकावणारी झुडपे असा अद्‍भुत, रम्य आणि आगळा निसर्ग लाभलेला प्रदेश म्हणजे लडाख.

लडाख या शब्दाचा अर्थ आहे डोंगरमाथा पार करून जाण्यासाठी असलेली वाट. येथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी डोंगर पार करावाच लागतो, त्यामुळे येथे अनेक ‘ला’ (पास) आहेत. लडाखचा प्रदेश समुद्रसपाटीपासून अकरा हजार फूट उंचीवर आहे. येथे ऑक्सिजनची कमतरता जाणवते. म्हणूनच तिथे पोहोचल्यावर हवेशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला किमान एक ते दोन दिवस द्यावे लागतात. हे या हवेची सवय नसणाऱ्या सर्वांच्याच बाबतीत होते. हालचालींचा वेग थोडा मर्यादित ठेवून सतत भरपूर पाणी प्यावे लागते. अशा या लडाखमध्ये आम्ही एका टुरिस्ट कंपनीबरोबर गेलो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com