

Nutritious Nachni Dhirdi and Kothimbir Vadi
esakal
अंकिता कार्ले
साहित्य
अर्धा किलो पनीर, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, गरजेनुसार बटर, ३ चमचे तिखट, ३ चमचे किचन किंग मसाला, प्रत्येकी २ चमचे धने व जिरे पूड, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी कोथिंबीर, प्रत्येकी १ चमचा हिंग व हळद, गरजेनुसार पाणी.
कृती
कढईत बटर गरम करून त्यात हिंग आणि हळद घालावी. मग कांदा परतून घ्यावा. नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर घालून मिश्रण छान एकजीव करावे. त्यात तिखट, किचन किंग मसाला, धने व जिरे पूड आणि मीठ घालावे. आता हे मिश्रण एकत्र करून त्यात थोडेसे पाणी घालावे, जेणेकरून भुर्जी कोरडी होणार नाही. सगळ्यात शेवटी कुस्करलेले पनीर घालावे आणि दोन मिनिटे भुर्जी शिजू द्यावी. चविष्ट पनीर भुर्जी तयार.
साहित्य
एक वाटी बासमती तांदूळ, २ वाट्या खोवलेला नारळ, १ वाटी साखर, १ वाटी आंब्याचा रस, २ चमचे तूप, गरजेनुसार पाणी.
कृती
कुकरमध्ये तूप गरम करून त्यात खोवलेला नारळ, साखर व आंब्याचा रस घालावा. त्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेला तांदूळ घालून गरजेनुसार पाणी घालावे. सगळे मिश्रण नीट एकत्र करावे व कुकरच्या तीन शिट्या काढाव्यात. गरमागरम भात तूप घालून सर्व्ह करावा.
टीप
आंब्याच्या रसाऐवजी फोडीही घालता येतात. आंब्याचा हंगाम नसताना तयार मँगो पल्प घालूनही हा भात करता येतो.