Premium|Election Campaign: महापालिका निवडणुकीत तंत्रज्ञानाचा वाढता वापर: प्रचाराचे नवे तंत्र

Politics: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये यंदा प्रचारतंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे स्पष्ट दिसून आले. गुगल, यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देत राजकीय पक्षांनी दृश्याधारित प्रचारावर भर दिला.
Election Campaign

Election Campaign

esakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मतदानाआधीच्या दोन आठवड्याभरातील घडामोडी या तशा खासच ठरत गेल्या. खरंतर हा लेख वाचकांच्या हाती पडेपर्यंत राज्यातील महापालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले असतील. मात्र या निकालांची पार्श्वभूमी तयार होण्याचा महत्त्वाचा टप्पा हा या गेल्या दोन आठवड्यांमध्ये पार पडला. निवडणूक प्रचाराची वास्तवातली धांदल, सेलिब्रिटी वा इन्फ्लुएन्सर्सनी घेतलेल्या बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाखतींच्या योग्यायोग्यतेविषयीच्या ऑनलाइन चर्चा, निवडणूक प्रचाराचे रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपन्यांवर पोलिसांनी टाकलेले छापे, निवडणुकीपूर्वीचे पैसे वाटपाचे आरोप-प्रत्यारोप, प्रत्यक्ष मतदान ते एआय वापरून निवडणूक निकालांचे अंदाज असे सर्व टप्पे यादरम्यान पार पाडले. याच दरम्यानच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत निवडणूक प्रचारही होऊन गेला. ‘गुगल’ आणि ‘मेटा’सारख्या कंपन्यांना जोडीला घेत झालेल्या ऑनलाइन प्रचाराचा खर्च तर नोंदवलाही गेला आणि पर्यायाने अशा सर्व बाबी दखलपात्रही ठरल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com